औरंगाबाद

जिल्ह्यातील कृषी पंपाचा विज पुरवठा सुरळीत करा


◾राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पाटेकर यांची मागणी

विलास लाटे/पैठण : औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत असताना त्यात महावितरणने विज बिल वसुलीचा बहाना करून कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडल्याने शेतकरी पुरता हैराण झाले आहेत. हा खंडित केलेला विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी नुकतीच महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरण विभागाकडून ऐन उमेदीच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून दुष्काळ,कोरोना महामारी व अतिवृष्टी अशा विविध संकाटातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच महावितरणने विज बिल वसुलीसाठी कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. विज पुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी उपलब्ध असूनही पाणी देता येत नसल्याने पिके कोमेजून जात आहे. यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना विज बिल भरण्याची मुदत वाढवून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांची पिके जगतील व शेतकरी विज बिलही भरतील. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनावर विशाल थोटे, एजाज शेख, राजु बोंबले, बाबासाहेब दाभाडे, सोमिनाथ श्रीखंडे, योगेश गिरजे, राहुल ताठे,अफसर शेख, आरेफ शेख, बद्रीनाथ गोर्डे, देविदास गोर्डे, मार्तंड लिपाने, सदाशिव नलावडे, लक्ष्मण पाटेकर, उल्हास ताकवाले, हरी गोर्डे, योगेश गिरगे, जयसिंग वाहटुळे, दिपक फुलारे, पवन गव्हाने, नामदेव शरणागत, ऋषिकेश मुळे, कृष्णा घोंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button