साहित्य व संस्कृती

145 सन्मान पिडीत आदिवासी बंधु भगिनी व आई बाबांच्या चर्णी अर्पण- नामदेव भोसले

अहमदनगर/ जावेद शेख : आज मराठी साहित्य मंडळ आयोजित तिसरे राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर संमेलन म्हसवड जि.सातारा, येथे पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र या साहित्य संमेलनांमध्ये आदिवासी समाजसेवक व आदिवासी साहित्यिक, नामदेव भोसले यांना समाज भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नामदेव भोसले यांचे आई शेवराई ज्ञानदेव भोसले व वडील ज्ञानदेव भोसले यांनी हा नामदेव यांचा 145 वा सन्मान स्विकारला.
या वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले बोलत होते. आजपर्यंतचे माझे सर्व 145 संन्मान मी माझ्या दुःखी पिडीत आदिवासी बंधु-भगिनी व आई वडीलांच्या चरणी अर्पण केले आहेत. या साहित्य संमेलनाचे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा राजरत्न आंबेडकर व अध्यक्ष म्हणून खाजदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित होते. जेष्ट साहित्यिक जयप्रकाश घुमटकर यांच्यासह राज्यातील कवी, व्याख्याते, सन्मानित पुरस्कार विजेते या मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. दुपारी कवी संमेलन व परिसंवाद कार्यक्रम झालेे. 
या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य भूषण पुरस्कार व समाज भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नामवंत सत्कारमूर्तीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले. या कार्यक्रमास नामदेव भोसले, ग्रीष्म तुकाराम भोसले, आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button