औरंगाबाद

पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी फरार आरोपी डॉनला केले जेरबंद

विलास लाटे/पैठण : पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी कलम ३७९,५११ ,३५३, ३३२ तथा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ मधील फरार आरोपी अमजद उर्फ डॉन अब्दुल शेख वय ३० वर्ष राहणार पिंपळवाडी तालुका पैठण यास रोशनपुरा बालेपीर नगररोड बीड येथून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या वाहन क्र. एम.एच.०१ : बी.आर. २४५८ या वाहनासह ताब्यात घेतले.

सदर आरोपीस यापूर्वी दरोडे, रात्रीच्या घरफोड्या, एटीएम बुडातून कापून उचलून नेणे, इतर चोऱ्या, हद्दपार आदेशाचे उल्लंघन अशा विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सदर आरोपी त्याच्या साथीदाराच्या मदतीने अद्यापही अहोरात्र उच्छाद मांडतच होता. सदर आरोपींनी औद्योगिक वसाहतीमध्ये मागील दहा वर्षापासून धुमाकूळ घातला होता. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, गणेश खंडागळे, पोलीस अमलदार मिलिंद घाटेश्वर, विष्णू बापटे आदी पोलीस कर्मचाऱ्यानि केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button