राजकीय

देवळाली प्रवरात गुरुवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा-श्रीरामपूर रोडवरील सहारा मंगल कार्यालयात गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.डॉ.सुधीर तांबे व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव करण ससाणे, जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व शिर्डी संस्थान विश्वस्त सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे निमंत्रक ज्ञानदेव वाफारे, सरचिटणीस अंकुशराव कानडे, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, देवळाली प्रवराचे पक्ष निरीक्षक संजय पोटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसने कंबर कसली असून या मेळाव्यात त्या दृष्टीने महत्वाची चर्चा व निर्णय होणार आहे.
तरी या मेळाव्यास काँग्रेस कार्यकर्त्यासह समर्थक व नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, देवळाली शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, कार्याध्यक्ष कृष्णा मुसमाडे, वैभव गिरमे, नानासाहेब कदम, उत्तमराव कडू, महिला काँग्रेस अध्यक्षा भाग्यश्री कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील, दीपक पठारे, अजय खिलारी, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब लोखंडे, राजेंद्र बोरुडे, कुमार भिंगारे, गीताराम बर्डे, जयेश माळी, दत्तात्रय मुसमाडे, भाऊसाहेब गुंजाळ, बाळासाहेब सगळगिळे, वसंतराव कदम, सुभाष निर्मळ, गंगाधर गायकवाड, भागवत मुसमाडे, गणेश पठारे, चांगदेव चव्हाण, डॉ. फिरोज शेख, तैनूरभाई पठाण ,शाहबाझ पठाण, जावेद सय्यद, कारभारी वाळुंज, कारभारी होले, सचिन निमसे, गजानन घुगरकर, संदीप मुसमाडे, अविनाश लांडगे, संदीप महाडिक, नवनाथ लोखंडे, सचिन पाटील, विलास संसारे, प्रदीप पंडित आदिंसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button