औरंगाबाद

बैलगाडीला धडकुन दुचाकीस्वाराचा मृत्यू

 
विलास लाटे/पैठण : तालुक्यातील दावरवाडी येथील एका ४३ वर्षीय इसमाचा बैलगाडीला धडकुन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी,३० रोजी सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान घडली. विष्णू चंद्रभान सोरमारे असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

विष्णु सोरमारे हे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान दुचाकी (क्र. एम एच २० डिएक्स ८४७७ ) वरुन पैठण कडुन दावरवाडीकडे येत असताना पैठण पाचोड राज्य महामार्गावर दावरवाडी जवळ अंधारात बैल गाडी समोरुण जाताना दिसली नसल्याने सोरमारे हे बैल गाडीला पाठीमागुन धडकुन जागीच ठार झाले.

घटनेची माहिती पाचोड पोलिसांना व कुटुंबातील नातेवाईकांना मिळताच सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस ठाण्याचे बीट जमादार प्रशांत नांदवे, अभिजीत सोनवने, पवन चव्हाणसह छावा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, ज्ञानेश्वर तांगडे, नाथाजी सोरमारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी असलेले विष्णु सोरमारे यांना पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन रविवारी सकाळी पैठण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. ते छावा क्रांतिवीर सेनेचे मराठवाडा सचिव भगवान सोरमारे यांचे बंधू होत.

घटनेची माहिती पैठण पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक राम सांगडे, जमादार सुधीर ओव्हळ आदींनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मयत विष्णु सोरमारे हे कुटुंबातील कर्ते असल्याने संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. ते एका खाजगी कंपनीत काम करुण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button