औरंगाबाद

शिवणी येथे हायमास्ट लॅम्पचे उद्घाटन

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील शिवणी येथे साडेचार लाख रुपयांचे तीन हायमास्ट लॅम्प बसविण्यात आले. या लॅम्पचे ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे, सुलतानाबी शामद शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे, सुलतानाबी शामद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून गावात हायमास्ट लॅम्प बसविण्याची मागणी होत होती. हि मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य काळे व श्रीमती शेख यांनी पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी गावकऱ्यांना ही भेट दिली. या लॅम्पमुळे गावकऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणाला गावात लख्ख प्रकाश मिळणार आहे.

याप्रसंगी गावातील कृष्णा काळे, दिलीप मराठे, गणेश कोरडे, अंकुश कोरडे, शरीफ पठाण, अलीम शेख, चंद्रकांत काळे सह आदी महीला व ग्रामस्थ उपस्थित होते. या हायमास्ट लॅम्पसाठी सरपंच अतुल क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button