औरंगाबाद

सेवाज्येष्ठ अभियंत्यांना डावलून मर्जीतल्या कार्यकारी अभियंत्याकडे अतिरिक्त कार्यभार

किरण काळे पाटील
शासन निर्णयाला केराची टोपली

◾४९ सेवाजेष्ठ अभियंत्यांवर अन्याय – स्वाभिमानी छावा संघटनेचा आरोप

विलास लाटे/पैठण : जि.प.बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता या पदाचा कारभार जि.प. बांधकाम उपविभाग सिल्लोड येथील उप अभियंता के. एस. भोसले यांना इतर सेवाजेष्ठ अभियंता यांना डावलुन व आर्थिक व्यवहार करुन नियमबाह्य अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. तसेच के.एस. भोसले हे जि.प. अध्यक्ष यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे इतर जेष्ठ अभियंता यांच्यावर अन्याय करुन राजकीय दबाव आणुन त्यांना नियमबाह्य अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. या विरोधात स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे प्रदेश सचिव किरण काळे पाटील यांनी आरोप केला असून याबाबत त्यांनी संबंधित जबाबदार अधिकारी यांना सविस्तर निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास स्वाभिमानी छावा मराठा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिलेला आहे. 

अध्यक्ष यांच्या चुलत भावाला पदभार देण्याचा उद्देश फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तसेच ठेकेदार व नेतेमंडळी यांचे खिसे भरण्यासाठी श्री. भोसले यांना अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. सदरील पदभार देण्यात आल्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ४९ सेवाजेष्ठता असलेल्या अभियंत्यावर अन्याय होऊन त्यांना मिळणाऱ्या जि.प. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या अतिरिक्त पदापासून वंचित ठेवण्यात येत आहे.

या सर्व प्रकरणामध्ये अध्यक्षांच्या अवती भोवती फिरणारे हे अधिकारी व कर्मचारी आहेत. शिवाय या कर्मचाऱ्यांनी जि.प. अंतर्गत प्रत्येक विभागात सावळा गोंधळ सुरु केलेला आहे. त्यामध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांचा वरदहस्त आहे. यापुढे भविष्यात ही मंडळी काय करेल याची शास्वती नाही. जसे की, निकृष्ठ दर्जाच्या कामाचे बोगस बिले काढणे, भ्रष्टाचार करणे, न केलेल्या कामांची बोगस बिले काढणे अशा विविध प्रकारे भ्रष्टाचार करण्यात येईल. अध्यक्षांना व मर्जीतील ठेकेदारांना सोयीस्कररीत्या श्री. भोसले यांच्या मार्फत कंत्राटसह ई-टेंडर मॅनेज करुन देण्यासाठी त्यांना अतिरिक्त कारभार दिला का अशी चर्चा सध्या जिल्हा परिषद कार्यालयात सुरु आहे. आम्ही स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतिने निवेदन दिले असुन राजकीय दबामुळे कारवाई न झाल्यास स्वाभिमानी छावा संघटना न्यायालयात धाव घेऊन सेवाजेष्ठ अभियंता यांना न्याय मिळवुन देणार असुन पदा पासुन वंचित ठेवलेल्या ४९ अभियंता यांंच्या पाठीशी आम्ही खंबिरपणे उभे राहणार आहोत असे छावाचे प्रदेश सचिव किरण काळे यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button