औरंगाबाद

कारकीन येथे ‘आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ’ कार्यकारिणी जाहीर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डॉ.घोडके यांच्यावतीने मोफत मधुमेह तपासणी

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील कारकीन येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार (दि.१) रोजी आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यावेळी ढोरकीन येथील आपत्कालीन सेवा विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश घोडके, ब्ल्युक्राॕस कंपनी विभागातील मॅनेजर जगदीश निकम, आरती गिरजे  यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी करुन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोरे, ढोरकीन येथील महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ मुळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष पंढरीनाथ नारळे, उपाध्यक्ष अण्णासाहेब गुंजाळ, सचिव बाबासाहेब वैद्य, कोषाध्यक्ष मुरलीधर लिपाने, संघटक प्रकाश लिपाने, सदस्य कडूबाळ नवले, लक्ष्मण बोर्डे आदींची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यावेळी डॉ.घोडके, बाजीराव गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांना हरिपाठ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शामराव भावले, अनिल मुळे, इब्राहिम पटेल, विमलबाई लिपाने, कलाबाई गुंजाळ, सलिमाबी पठाण, कडुबाई बोर्डे यांच्यासह कारकीन येथील ज्येष्ठ नागरिकांची, महिलांची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button