राजकीय

देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीसाठी युवकांची काळे यांना पसंती

देवळाली प्रवरा : काही महिन्यांत येत असलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणूकीसंदर्भात अंबिकानगर सोमेश्वर वसाहत मधील युवकांनी बैठक आयोजित केली होती.


या बैठकीत स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यांची तळमळ असलेला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशांत काळे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी या भागातील युवकांनी बैठकीत ठरविले आहे. येणाऱ्या देवळाली प्रवरा निवडणूकीत युवकांचा काळे यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्ह दिसायला मिळणार आहे.

या बैठकीत अंबिकानगर सोमेश्वर वसाहत या भागातील ठराविक मुद्दे तसेच समस्या व उपाय यावर प्रसाद लोखंडे, ज्ञानेश्वर मोरे, सुरेशदादा शेजुळ, दत्तापटिल साळुंके व राजाभाऊ साळुंके तसेच इतर कार्यकर्ते यांनी मते मांडली. यावेळी धनंजय डोंगरे, मुसाभाई तांबोळी, किशोर पवार, साई सातपुते, राहुल हारदे, गजानन गाढे, डॉ.प्रवीण पाखरे, गोविंद खवडे, विठ्ठल बर्डे, मुसा पठाण, सामी तांबोळी, सतिश वाघ, सागर आहेर, संतोष शिरसाठ, योगेश गायकवाड, अजय डुकरे, प्रसाद वाघमारे, शुभम वाघमारे, ज्ञानेश्वर वाघ, विशाल बोर्डे, पांडू शिंदे, निलेश भावर, बाळू थोरे, किरण तुपे, संतोष दाभाडे, योगेश बोरुडे, देविदास डोंगरे, बाळासाहेब खेडकर, सागर बोरुडे, प्रवीण थोरे, अंकुश हरिश्चंद्रे, संतोष कायगुडे, प्रशांत शेंडे, परवेज पठाण, अशोक पवार, अमोल वरखडे, रोहित काळे, ओंकार साळुंके, अमर लोखंडे आदींसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button