औरंगाबाद

पाचोडचा आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भाजपाचे धरणे आंदोलन…

विजय चिडे/ पाचोड : गत दिड वर्षापासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्याने शेतात पिकविलेला माल तसेच शेतकऱ्यांना जनावरे विक्री खरेदी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्यामुळे रविवारी (दि.१९) रोजी सकाळी आकरा वाजता भारतीय जनता पार्टी सह शेतकरी व विविध संघटनाकडून येथिल बस स्थानकांसमोर बाजार सुरू करण्यात यावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले असून महसुल विभाग व पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांना बाजार सुरू करण्यात यावा यासाठी लेखी निवेदन देण्यात आले.

पाचोड येथिल बाजार पेठेत परीसरातील तिस ते चाळीस खेड्या पाड्यातील शेतकऱ्यांसह असणारे छोटे व्यावसायिक, मिठाईवाले, भांडीवाले, कापड दुकानदार, शेती उपयोगी अवजारे विक्रेते, दोरखंड विकणारे, गृहोपयोगी वस्तू विकणारे, झाडू विकणारे, चटई विकणारे, फळ विक्रेते आदी व्यावसायिकांच्या जिवणांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व व्यावसायिक आठवडी बाजारामध्ये आपल्या कमी भांडवला मध्ये अल्प नफा कमवून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र कोरोनामुळे या सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय बंद आहे.

पाचोड येथिल आठवडी बाजार हा मराठवाड्यातील सर्वात मोठा बाजार शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे गाई, म्हशी, बैल, शेळी, मेंढी त्याचबरोबर कोंबडी, अंडी यांचाही आठवडी बाजार बंद असल्यामुळे व्यापार करणारे शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होत आहे. बाजार बंद असल्याने शेतीमालाला व जनावरांना योग्य किंमत मिळत नसल्यामुळे महागाईमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शासनाच्या निर्णयानुसार राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने आदींना परवानगी दिली आहे. मात्र, पाचोड येथिल आठवडी बाजाराला अद्याप परवानगी देण्यात आलेली  नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बद्रिनारायण भुमरे, ॲड.रनवीर नरवडे, रंजीत नरवडे, पवन गटकाळ, भागवत भुमरे, निखिल काळे, दादासाहेब भुमरे, संतोष जगताप, गणेश करडभाजे सह विविध संघटनांचे पदधिकारी या आंदोलनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक प्रशांत सुतळे, सहाय्यक फौजदार सुधाकर मोहिते, पोलिस नाईक भगवान धांडे, पोलिस कर्मचारी सुधीर भट, पवन चव्हाण आदीने कडक बंदोबस्त ठेवून महामार्गावर झालेली रस्ताकोंडी सुरळीत केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button