औरंगाबाद

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण गंभीर जखमी


पैठण : तालुक्यातील ढोरकीन नजीक असलेल्या देवगिरी हूर्डा पार्टी समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.४) रोजी दुपारी अकरा वाजे दरम्यान उघडकीस आली. सुभाष भाऊलाल दळे (३५, रा.कारकीन ता.पैठण) असे जखमीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, ढोरकीन पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या देवगिरी हूर्डा पार्टी समोरुन माजी आमदार संजय वाघचौरे हे जात असताना त्यांना एक इसम रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. त्यांनी गाडी थांबवून जवळ जाऊन बघितले असता सुभाष दळे हे जखमी व बेशुद्ध अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. दळे यांना पायी जात असताना एखाद्या अज्ञात वाहनाने उडविले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान वाघचौरे यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच आपात्कालीन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश घोडके यांना फोन करून कळविले. माहिती मिळताच डॉ घोडके यांनी रुग्णवाहिका चालक संदीप घोडके सह घटनास्थळी धाव घेतली. स्वतः वाघचौरे यांनी जखमीस रुग्णवाहिकेत उचलून टाकण्यास मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. तदनंतर डॉ घोडके यांनी जखमीस पुढील उपचारकामी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button