सामाजिक

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी द्या- मनसेची मागणी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : कोरोना नियमांचे पालन करुन काही दिवसांवर होऊ घातलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन देत करण्यात आली आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल भैय्या डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याकरिता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर परिसरातील सर्व सार्वजनिक मंडळांच्या स्वाक्षऱ्या होत्या. यावेळी वैभव गाढे, सचिन सोनवणे, सौरभ निकम, सुरज कोठुळे यादी मनसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button