सामाजिक

सर्पमित्र राहुल गायकवाडने दिले अजगराला जिवदान

राहुरी विद्यापीठ/ प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भुपाळी वसाहती मध्ये अजगर जातीचा साप अढळुन आल्याने सर्पमित्र राहुल गायकवाड यास फोन वरुन कळवले असता राहुल व त्यांचा सहकारी संदिप लोहक ने सदर ठिकाणी तात्काळ जाऊन ह्या बारा फुट लांब व सुमारे पंचविस किलो वजनाच्या ह्या अजगरास पकडून जंगलात सोडले.


या अजगराची माहीती देताना राहुल गायकवाड याने सांगीतले की, हे अजगर इंडीयन रॉक पायथन या शास्त्रीय नावाने ओळखले जातात. पाणथळ जागेत त्यांचे सर्रास वास्तव्य असते. हे मोठ्या आकाराचे साप १८ ते २० फुटांपर्यत वाढतात. यांचे अयुष्य २५ वर्षापर्यंतचे असुन हे पुर्ण बिनविषारी साप आहेत. सध्या हे सरिस्टपांचा विनिचा हंगाम असुन ह्या अजगराची मादी २० पर्यंत अंडी घालते. त्यामध्ये १२ ते १५ पर्यत पिल्ली जन्म घेतात.

हल्ली मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने ह्या जिवांना लपण्यासाठी जागा मिळत नसल्याने मानवी वस्तीत हे अढळत आहे. जनतेने कृपया मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड थांबवावी. हे जिव वाचले तरच जैववैविधता टिकुन राहील पर्यावरण संतुलीत राहुन निसर्ग चक्राचा क्रम आबाधीत राहील  कृपया जंगलांचा, वृक्षाचा, पक्षांचा र्हास थांबवण्याचे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे. राहुल गायकवाड यांनी आज पर्यत विषारी बिनविषारी अशा हजारो सापांना जिवदान देऊन निसर्गात सोडले आहे.

Related Articles

Back to top button