शासकीय योजना
केंद्र सरकारची श्रमिक/ लेबर कार्ड योजना
सध्या केंद्र सरकारने घरगुती कामे करणाऱ्या महिलांसाठी, सुतार, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, प्लंबर , भाजी विक्री करणारे इत्यादी सर्वासाठी श्रमिक कार्ड योजना काढली आहेे. त्यामुळे सरकारी दफ्तरी अश्या असंघटित कामगाराची नोंद होणार आहेे. त्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे
नक्की कोण नोंदणी करू शकते ?
१)ज्यांचे पीएफ मध्ये पैसे जमा होत नाही
२) ज्यांचे ESIC चा विमा नाही
३) जे इन्कमटॅक्स मध्ये येत नाही
🗒️ ह्या कार्ड साठी लागणारे कागद पत्रे
१) आधार कार्ड
२)आधारला जोडलेला मोबाईल
३) जर आधारला मोबाईल जोडला नसेल तरी ती व्यक्ती स्वतः ऑफिसला येणे गरचेजे आहे
4)बँक खाते पासबुक
तरी सर्वांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि ही माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पहोचविण्यासाठी मदत करावी
वरील योजनेचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र, येथे भरावे.