औरंगाबाद

अंगणवाडी पोषण माह अभियानाचे ढाकेफळ येथे शुभारंंभ

पैठण : केंद्र शासनाच्या आदेशान्वये मागिल तीन वर्षा पासुन देशात पोषण आहार माह राबविण्यात येत आहे. या आदेशान्वये पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील  अंगणवाडीत दि.१ सप्टेंबर पासुन ते ३० सप्टेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे.
या वेळी ढाकेफळच्या उपसरपंच कमलताई शिसोदे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिल अंकुशे, सुपरवायझर लक्ष्मी हेबारे, ग्रामपंचायत सदस्य मनेश आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्येची देवता माता सरस्वतीचे पुजन तसेच दिपप्रज्वलन करुण आभियानाची सुरवात करण्यात आली.
देशाला भविष्यात सुदृढ, निरोगी, बलवान व मानसिक सक्षम ठेवायचे असल्यास मातेच्या उदरा पासुन ते किमान सहा वर्षे पर्यंतच्या बालकांचा सर्वांगीन विकास सकस पोषन आहारानेच होऊ शकतो असे मार्गदर्शन बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिल अंकुशे यांनी उपस्थित पालक माता, भगिनी, अंगणवाडी कार्यकर्त्यांताई व मदतनीस यांना यावेळी केले.
या पोषण आहार माह अभियानाच्या शुभारंंभ  प्रसंगी मुख्यध्यापिका शिंदु घुले, अंगणवाडी कार्यकर्त्या मिराबाई गोरेसह शिक्षक कैलास ढोले, दगडाताई मुळे, शोभा साबळे, छबुबाई पवार, सुमनबाई आव्हाड , शारदा कडवे, रजनीताई गुरव, जोती डांगे, सुमन वाघ, माजी सरपंच दादासाहेब गोरे यांच्या सह माता भगिनी तसेच पालक, नागरिक हजर होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button