शासकीय योजना

“अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ” मार्फत वैयक्तिक व्याज परतावा योजना

 वेबसाईट:- 
www.mahaswayam.gov.in
  
अर्ज ऑनलाईन करण्यासाठी लागणारे आवश्यक कागपत्रे-
१) तहसील दारांचे कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र (8 लाखांच्या आत असावे) किंवा कौटुंबिक
Income Tax Returns (पती- पत्नी असतील तर दोघांचे एकत्रित रिटर्न्स काढावे जे आठ लाखांच्या आत असणे अनिवार्य राहील, सोबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल
२)महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावा:- रेशन कार्ड/ लेटेस्ट वीज बिल/तहसील दारांचे रहिवाशी/पासपोर्ट/ लेटेस्ट फोन बिल (आधार कार्ड वरील पत्ता आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असलेला पत्ता हा एक यावा)  यापैकी कोणतेही एक
३) आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
४) फोटो-१
इतर कागदपत्र:- मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्ड यापैकी एक
   हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक online प्रिंट येईल, LOI (पात्रता प्रमाणपत्र)
 ते तुम्ही बँकेत घेउन जावा,बँकेने प्रकरण मंजूर केल्यानंतर  बँकेकडून 
१)Sanction Letter (बॅंकेचे मंजुरी पत्र)
२) Disbursement Proof (कर्ज वितरणाचा पुरावा)
३) EMI Statement ( हफ्ते सूची)
   तसेच CA कडून Project Report(प्रकल्प अहवाल)
  हे सर्व कागदपत्रे उपलोड करून घ्या.
यानंतर  तुमचा आधार लिंक असलेला खाते क्रमांक टाका,प्रत्येक वेळी तुम्ही बॅंकेचा हफ्ता भरल्यानंतर claim करून बॅंकेचा हफ्ता भरल्याची तारीख, रक्कम व बँकेकडून  हफ्ता भरलेले  स्टेटमेंट घेऊन तुमच्या ID वर अपलोड करून कळवा,त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात १२  टक्के पर्यंतचे व्याज महामंडळ मार्फत जमा होईल.
टिप:- उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सिबिल प्रणालीचे सदस्य असलेल्या बँकेत करणे आवश्यक  आहे.
अटी:-
१)उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
२) उमेदवार हा शासकीय कर्मचारी नसावा.
३)उमेदवाराचे कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाखांच्या मर्यादेत असावे.
४)उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
५)उमेदवाराचे वय १८ ते ४५ दरम्यान असावे(आधार कार्ड वरील वय हे ग्राह्य धरले जाईल)
६)दिव्यांग उमेदवाराकडे सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र असावे.
७) लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार लिंक असणे अनिवार्य राहील.सध्याचा मोबाईल क्रमांक अद्यावत असावा.
 खालील उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध👇👇👇👇
◼दुग्ध व्यवसाय/डेरी
◼गाय /म्हैस गोटा
◼शेली पालन
◼कुक्कुटपालन 
◼चिकन सेंटर
◼मसाल्याचे पदार्थ तया
◼पापड तयार करणे व विक्री
◼अगरबत्ती तयार करणे व विक्री
◼पर्स / पाकिट तयार करणे व विक्री
◼टॅक्सी व्यवसाय
◼रिक्षा व्यवसाय
◼भाजीपाला विक्री व व्यवसाय
◼मेडिकल स्टोअर्स 
◼सायबर कॅफे व्यवसाय
◼ट्रान्स्पोर्ट व्यवसाय (तीन / चार चाकी वाहन)
◼पार्लर (जेन्टस् / लेडीज)
◼होटेल व्यवसाय
◼कापड दुकान व्यवसाय
◼किराणा दुकान व्यवसाय
◼झेरॉक्स / प्रिन्टर्स व्यवसाय
◼कम्प्युटर इन्सिटट्यूट 
◼साडीवर नक्षीकाम (एम्ब्रायडरी) व्यवसाय
◼फळ विक्रेता व्यवसाय
◼ओली / सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय
◼टेलरिंगचा व्यवसाय
◼तसेच लघु उद्योगांतर्गत येणारे सर्व उद्योग व धंद्यासाठी.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button