सामाजिक

गंगापूर येथे श्री संत सावता माळी युवक संघाच्या शाखेचे उद्घाटन, रक्तदान शिबीर संपन्न

चिंचोली प्रतिनिधी : गोरगरीब, सर्वसामान्य तसेच रंजल्या गांजल्यांच्या गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी समर्पित राहिल्यास तोच खरा परमार्थ ठरतो संत सावता महाराजांची हि शिकवण अंगीकारल्यास सामाजिक प्रगतीत संघ नक्कीच अग्रभागी राहिल. सावता माळी युवक संघाची वाटचाल योग्य दिशेने असून सामाजिक चळवळीत संघाचे मोठे योगदान आहे. आजवर ३२ हजार गरजू नेत्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रीयेद्वारे पुन्हा डोळस करण्याचे भाग्य संघाला लाभले असून आगामी काळातही अशी सामाजिक कामे अविरत सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी केले.
तालुक्यातील गंगापूर (माळेवाडी) येथे शाखा उद्घाटन प्रसंगी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बबन भुजबळ तर व्यासपीठावर उद्योजक स्वप्नील भास्कर, संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, अमोल वाकचौरे, अजिंक्य मेहेत्रे, दिपक साखरे, प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. पुनम निघुते, डॉ. प्रसाद चौधरी, जनसंपर्क अधिकारी भरत वर्पे, चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे, गंगापुरचे सरपंच सतीष खांडके, एकनाथ नान्नोर, सयाजी शेंडगे उपस्थित होते.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे तसेच रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीरात गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. उद्योजक मेहेत्रे प्रसंगी म्हणाले संघ सामाजिक कामाबरोबरच बेरोजगार तसेच गरजू तरुणांना स्वयंरोजगारासाठी छोट्यामोठ्या उद्योगांविषयी मार्गदर्शन बरोबरच त्यांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी सदोदित प्रयत्नशील आहे. तरुणांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी स्वप्नील भास्कर, अशोक तुपे, भरत वर्पे आदिंची समयोचित भाषणे झाली.

प्रसंगी येथील शाखाध्यक्ष ओंकार भुजबळ, उपाध्यक्ष साईनाथ भुजबळ, शिवाजी भुजबळ, मुकेश भुजबळ, ओमकार भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ भुजबळ, नितीन शिंदे, माऊली भुजबळ, महेश भुजबळ, अमोल भुजबळ, तुषार गाडेकर आदि पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओंकार भुजबळ तर आभार प्रदर्शन शिवाजी भुजबळ यांनी केले.

Related Articles

Back to top button