सामाजिक

नानलपेठ ते जेल कॉर्नर या रस्त्याच्या मागणीसाठी संतप्त नागरीकांचा रस्तारोको

परभणी प्रतिनिधी : शहरातील नानलपेठ ते जेल कॉर्नर या रस्त्याच्या मागणीसाठी नानलपेठ भागातील संतप्त नागरीकांनी गोविंदराव इक्कर यांच्या नेतृवाखाली  महानगरपालिकेच्या विरोधात सोमवारी दूपारी जोरदार रस्तारोको आंदोलन केले.


साने चौकापासून ते शनिवार बाजार तेथून पुढे आंध्रा बँक कॉर्नरपासून ते जेल कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावर छोट्या मोठ्या आकाराचे हजारो खड्डे आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खड्ड्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत. खड्ड्यांमुळे दोन विद्यार्थी व एका पोलिस अधिकाऱ्याचा  मृत्यू झाला. परंतु, महापालिका प्रशासनास या घटना होवूनसुध्दा जाग आली नाही.त्यामुळे सोमवारी गोविंदाराव इक्कर यांच्या नेतृवाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण रस्त्याचे काम करून देऊ असे ठोस आश्वासन दिले आहे.

Related Articles

Back to top button