उंदीरगाव येथे पशु वैद्यकीय केंद्राची गरज
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज उंदिरगाव येथे ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली. सर्वप्रथम ग्रामसेवक डौले यांनी ग्रामसभा इतिवृत्तांत वाचन केले.
यावेळी सागर गिर्हे या ग्रामस्थाने गावामध्ये वेळेवर पाणी येत नाही, उंदिरगाव -खैरी, उंदिरगाव -गोंडेगाव, उंदिरगाव खानापुर या रस्त्यांचे प्रस्ताव जिल्हा परीषद तसेच आमदार खासदार यांना त्वरित पाठवावे तसेच शासनाकडुन पशुपालकांना मिळणारे अनुदान आणि विविध योजनांसाठी इअर टॅगींग तसेच पशुधन कार्डसाठी आपल्या गावामध्ये विलंब होत असल्याची तक्रार केली.
तसेच आपल्या गावामध्ये नवीन पशुवैद्यकीय उपकेंद्र व्हावे, महिलांसाठी कमीत कमी 4 ठिकाणी बाथरुम, टॉयलेटची व्यवस्था व्हावी, इतर गावांमध्ये अद्ययावत लायब्ररीसाठी भरीव निधी उपलब्ध होतो मग आपल्या गावाला का नाही ? अशी खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे वाढलेल्या चोर्या बघता याआधीच केलेली CCTV तसेच स्ट्रीट लाईट का बसवले नाही असा प्रश्न उपस्थित केला. नियमीत पाणीपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना आरऒचे पाणी मोफत मिळण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी सागर गिर्हे यांनी करत ग्रामपंचायत पदाधिकार्यांना धारेवर धरलं. या सर्व मागण्यांना ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पंडीत तसेच तेथे उपस्थित ग्रामस्थांनी पुर्णपणे पाठींबा दिला.
त्यानंतर डाॅ. राजगुरु यांनी वैद्यकीय योजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतीभाताई गोलवड या होत्या. या ग्रामसभेला मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, संचालक विरेश गलांडे, माजी उपसरपंच रमेश गायके, बाळासाहेब निपुंगे, सदस्य स्वप्नील पंडीत, गिरीष परदेशी, उज्वला शेळके, प्रकाश ताके, रामचंद्र आव्हाड, सुनिल ताके, मुन्नाभाई ईनामदार, विरेश बोधक, अविनाश काळे, आदित्य बारहाते, आप्पा डोखे, हाजुभाई सय्यद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.