अहमदनगर
डॉ. शिल्पा भागवत यांची वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर नियुक्ती
राहुरी : येथील बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. शिल्पा कौस्तुभ भागवत यांची महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे उपस्थित होते.
डॉ. शिल्पा भागवत या राहुरी येथे गेल्या 5 वर्षांपासून बालरोग व नवजात शिशु तज्ञा म्हणून काम बघत आहे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे झाले असून पदव्युत्तर बालरोग मुंबई येथे पूर्ण झाले आहे. डॉ. शिल्पा भागवत या दंतरोग तज्ञ डॉ कौस्तुभ भागवत यांच्या पत्नी असून येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मधुसूदन भागवत यांच्या स्नुषा आहेत.