अहमदनगर

राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांच्या विशेष शिबिराचे आयोजन तांदुळनेर, ता. राहुरी येथे करण्यात आले होते.

या विशेष शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार होते. यावेळी उद्योजक राहुल साबळे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी यावेळी कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास कांबळे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ. अतुल अत्रे, डॉ. विरेंद्र बारई, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के उपस्थित होते.

यावेळी डॉ. दिलीप पवार आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की, विद्यार्थी व शेतकर्यांनी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी तयार व्हावे. याप्रसंगी राहुल साबळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, तरुणांनी गावातच शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारल्यास गावातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल.

यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्याला चालना मिळेल. यासाठी तरुणांनी शहरामध्ये जावून नोकरी मागण्यापेक्षा गावातच राहून नोकरी देणारे बनावे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिबिराचा अहवाल वाचून दाखवीला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद उबाळे याने तर आभार कु. ज्ञानेश्वरी ह्याळीज यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button