कृषी

स्मार्ट प्रकल्पांतर्गत गोबी पिकावरील शेतीशाळा प्रशिक्षण कार्यक्रम

राहुरी | जावेद शेख : आत्मा अंतर्गत स्मार्ट प्रकल्प मूल्य साखळी विकास या अंतर्गत मान्यताप्राप्त लोदेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी जामगांव यांच्या अधिनिस्त शेतकरी सदस्यांची गोबी पिकाची शेतीशाळा नरखेड तालुक्यातील सीगारखेडा येथील अनिल काये यांच्या शेतावर आयोजित करण्यात आली होती‌.

या शेतीशाळा प्रशिक्षणात सर्वप्रथम उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करून शेतीशाळा प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर मागील प्रशिक्षण कार्यक्रमात झालेल्या गोबी पिक प्रात्यक्षिक विषयी चर्चा करण्यात आली. त्यात गोबी पिकाची लागवड तंत्र, जमीन व हवामान, पूर्व मशागत, पेरणीची योग्य वेळ, बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया, पेरणी, बियाणे उगवण तपासणी करणे व त्याचे महत्व, जमीन आरोग्य पत्रिकानुसार बागायती गोबी लागवडीमध्ये खते, ओलीत व्यवस्थापन, अंतर मशागत व्यवस्थापन, पाणीपुरवठा असल्यास गोबी पिकाला किती ओलीत दिले पाहिजे व किती दिवसांनी दिले पाहिजे. तसेच गोबी पिकावर येणाऱ्या रोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.

सोबत पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन प्रकरणांमध्ये सेंद्रिय शेती करण्याकरता उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. सेंद्रिय शेती काळाची गरज असून आता ती आवश्यक झाली आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे व दुष्परिणाम या विषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर फिट व्हिजिटमध्ये भाजीपाला पीक पाहणी मध्ये लागवड पद्धती ओळी मधील अंतर, कीड व रोगाचे प्रादुर्भाव नाही. पीक सध्या फुलावर वर आहे त्यानंतर शेतकऱ्यांना गोबी पीक लागवड ते काढणी पश्चात विक्री व्यवस्था व मार्केटींग ह्या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शेतीशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाला ३५ पुरुष शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक शेखर खरपूरिया यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करणे गरजेचे असल्याचे सांगून उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून शेतीशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी नागपूर जिल्हा तंत्र अधिकारी स्वाती गावंडे, श्री. घिरडे, कृषि सहाय्यक रंजित खयतकर, संचालक गणेश रेवतकर, राजेंद्र मुरोडिया, बाबाराव कुमेरिया, मंगेश कुमेरिया तसेच लोदेश्वर ऍग्रो कंपनीचे सदस्य व मोठ्या प्रमाणात गोबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button