अभ्यास दौर्यामुळे ज्ञानात भर पडून शेतीमध्ये सुधारणा करणे शक्य – संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील
राहुरी विद्यापीठ : अभ्यास दौर्यामध्ये सहभागी शेतकर्यांनी भेटीसाठी निवडलेल्या यशस्वी कृषि उद्योजकांबरोबर चर्चा करुन त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचे अनुकरण आपल्या शेतीमध्ये करावे जेणेकरुन आपलीही प्रगती होईल. या अभ्यास दौर्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडून शेतीमध्ये सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे शेतकरी प्रथम कार्यक्रमांतर्गत पारनेर तालुक्यातील तिखोल व निघोज येथील प्रगतशील शेतकर्यांच्या शेतावर अभ्यास दौरा कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौर्याला शुभेच्छा देताना विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, विजय शेडगे, राहुल कोर्हाळे, किरण मगर उपस्थित होते. अभ्यास दौर्याचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. पंडित खर्डे यांनी केले.
या अभ्यास दौर्यामध्ये 8 महिला शेतकरी व 28 पुरुष शेतकरी सहभागी झाले होते. या अभ्यास दौर्यामध्ये तिखोल येथील श्री. ढोकेश्वर सेंद्रिय शेती गटाचे प्रवर्तक बाळासाहेब ठाणगे यांचा सेंद्रिय शेती प्रकल्प तसेच निघोज येथील डॉ. चैतन्य ढोरमल व सौ. श्रध्दा ढवण यांच्या श्रध्दा फार्म या 315 म्हशींच्या अत्याधुनिक गोठ्यास शेतकर्यांनी भेटी दिल्या. आभार विजय शेडगे यांनी मानले.