उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्काराने कैलास राहणे यांचा सन्मान
राहुरी | जावेद शेख : शिक्षण संचालनालय पुणे विभागाच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना अहमदनगर जिल्हा समन्वयक, चंदनापुरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदनापुरी ता.संगमनेर येथील उपप्राचार्य कैलास राहणे यांना प्राप्त झाला आहे.
शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे विभाग व राष्ट्रीय सेवा योजना अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरा आश्रम, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सहाय्यक संचालक अमरावती विभाग सिद्धेश्वर काळोखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून देखील विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त झाला. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक कैलास राहणे सहभागी झाले होते.
या पुरस्काराबद्दल अमरावती विभागाचे सहाय्यक संचालक सिद्धेश्वर काळोखे, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मालपाणी, पुणे विभागाचे विभागीय समन्वय पोपटराव सांबारे, पुणे जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक सूर्यवंशी, जालना जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक सोनवणे, अमरावती विभागाचे विभागीय समन्वयक जाधव, नाशिक विभागाचे विभागीय समन्वयक कासव, कार्यक्रमाधिकारी शिंदे आदींनी अभिनंदन केले.