कृषी

एकात्मिक शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करणे गरजे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

शासकीय कृषि पुरस्कारप्राप्त शेतकर्यांशी महात्मा फुले कृषि विद्यापीठात सुसंवाद

राहुरी | जावेद शेख : दिवसेंदिवस लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र घटत असून अल्पभूधारक शेतकर्यांची संख्या वाढत आहे. विद्यापीठाने एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल तयार करुन अल्पभूधारक शेतकर्यांसाठी मोठे संशोधन केले आहे. शेतकर्यांनी या एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा वापर आपल्या शेतीत केला तर त्यांची शेती फायदेशीर ठरेल. शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान इतर शेतकर्यांपर्यत पोहचविण्यासाठी कार्य करावे. अशा प्रकारच्या प्रयत्नातूनच एकात्मिक शेतीतील शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकर्यांशी सुसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के उपस्थित होते. डॉ. सी.एस. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विस्तार केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, कम्युनीटी रेडिओ फुले कृषि वाहिनी 90.8 एफ.एम. या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन शेतकर्यांपर्यत पोहचविण्याचे काम होत आहे. केंद्र शासनाने राहुरी कृषि विद्यापीठामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु करुन 12 हजार ड्रोन पायलट तयार करण्याची जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की कृषि पुरस्कारप्राप्त शेतकरी हे विद्यापीठाचे संशोधन इतर शेतकर्यांपर्यंत पोहचविणारे खरे दुत आहेत. या कार्यक्रमामध्ये विद्यापीठाच्या 10 जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा विस्तार केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे व कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषि पुरस्कारप्राप्त शेतकर्यांसह ऑनलाईन हजर होते.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील कृषि पत्रकारीता शासकीय पुरस्कार प्राप्त सुर्यंकांत नेटके, संदिप नवले, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, विष्णू जरे, मच्छिंद्र घोलप, सचिन जगताप, सौ. शैलजा नावंदर, सौ. प्रभावती घोगरे, सौ. सविता नालकर, विजय जाधव, राजेंद्र चौधरी, धुळे जिल्ह्यातील कृषिभूषण श्रीराम पाटील, पढावद ता. शिंदखेडा येथील प्रकाश पाटील, नंदुरबार येथील हिम्मत माळी, सौ. आशाताई राजपूत, सौ. मंजूषा परदेशी, सातारा येथील मोहन लाड, शंकरराव खोत, मोहोळ येथील उद्यानपंडीत किरण डोके व कोल्हापूर येथील विश्वनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्रीसुगी उन्हाळी-2024 या अंकाचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शासकीय पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी कृषिभूषण सुरसिंग पवार, अण्णासाहेब जाधव, आनंदराव गाडेकर, सौ. कविता जाधव, विठ्ठलदास आसावा, ताराचंद गागरे, प्रणय गाडे, यशोदिप म्हसे, मारुती डाके, सुदाम सरोदे इ. पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button