अहमदनगर

राहुरी पोलिसांचे ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ चे आवाहन

यावेळी शहरातील स्वच्छता दूतांचा सन्मान

राहुरी | जावेद शेख : दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील व्यापारी असोशियनची बैठक पोलीस ठाणे राहुरी येथे घेण्यात आली. यावेळी व्यापारी यांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांच्याकडे असणारे उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरे रोडच्या अँगल मध्ये लावण्याबाबत सूचना केल्या व लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना केल्या आहेत. सदर कॅमेरे हे पोलीस विभागाच्या निर्देशाप्रमाणे लावण्यात येत असल्याने कुणीही व्यापाऱ्यांना परस्पर मागणार नाही याबाबत लेखी पत्र देण्यात आलेले आहे.

राहुरी शहरातील पार्किंगची समस्या दूर करण्याकरिता राहुरी नगर परिषदेमार्फत पार्किंग रेषा आखून कारवाई करणे बाबत निर्णय घेण्यात आला. तसेच वाहतुकीस अडथळा करणारे अतिक्रमण नगरपरिषदेमार्फत तात्काळ काढून घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमादरम्यान राहुरी नगर परिषदेकडील स्वच्छता दूत यांचा त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता करण्याकरिता केलेल्या सहकार्याकरिता तसेच राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये करत असलेल्या स्वच्छतेच्या कार्याकरिता सन्मान करण्यात आला. ज्यांनी पोलीस स्टेशन व परिसराची साफसफाई कामासाठी मदत केली असे राहुरी नगरपरिषदचे सेंनीटर इन्स्पेक्टर श्री पवार, क्रेन उपलब्ध करून देणारे यमुनाजी आघाव, वकील दांपत्य दुहेरी हत्याकांडाचा तपास ज्याच्या सतर्कतेमुळे तत्काळ होवू शकला असे पो.कॉ.नदीम शेख, पो.कॉ.ढाकणे यांचा ही सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम तहसीलदार नामदेव पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

सदर कार्यक्रमाकरिता बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, राहुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे, व्यापारी असोशियनचे प्रकाशशेठ पारख, केमिस्ट् असोशियनचे सूर्यकांत भुजाडी, ऑटोमोबाईल असोशियनचे देवेंद्र लांबे, हार्डवेअर असोशियनचे विशाल तारडे, बिल्डिंग मटेरियल असोसिएशनचे कांताशेठ तनपुरे, फोटोग्राफर असोसिएशनचे वैभव धुमाळ, प्रवीण दरक कापड व्यापारी असोसिएशन, रवींद्र उदावंत ज्वेलर्स असोसिएशन, आत्तार कादरी मोबाईल दुकान असोसिएशन, प्रसाद कोरडे सलोन असोसिएशन, एकनाथ खेडेकर हॉटेल असोसिएशन, नंदू शेठ भट्टड पेंट असोसिएशन, मोहन जोरी फिटर असोसिएशन, सचिन वने फर्टीलायझर असोशियन, सलीमभाई शेख हॉकर्स असोसिएशन, अनिल कासार भांडी असोसिएशन, प्रवीण ठोकळे शूज मार्ट असोशियन, दीपक मुक्ता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक असोसिएशन, व राहुरी नगर परिषदेचे स्वच्छता दूत उपस्थित होते.

सर्व नागरिकांना / व्यापारी हातगाडी दुकानदार, ठेलेवाले, पथारीवाले यांना आव्हान करण्यात येते की, रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने आपली दुकाने लावू नयेत, मोटरसायकल वाहने पार्किंग करू नये, कोणत्याही रस्त्यावर अतिक्रमण करू नये, अन्यथा अतिक्रमणाबाबत नगरपरिषदे मार्फत व वाहतुकीस अडथळा केल्यास पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

_ संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे राहुरी.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button