शिक्षणवारी ज्ञान पंढरी
धैर्यशील काळे यांना लंडन युनिव्हर्सिटीची मास्टर ऑफ लॉ पदवी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्याचे भूमिपुत्र ॲड. अभिजित काळे यांचे चिरंजीव ॲड. धैर्यशील काळे यांनी नुकतीच लंडन युनिव्हर्सिटीची मास्टर ऑफ लॉ ही पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल मॉरनिंग वॉक गुपच्या वतीने त्यांचा पंडितराव बोंबले पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मॉर्निंग ग्रुपचे रविंद्र कळमकर, नानासाहेब इनामके, प्रशांत साळुंखे, भंडारी, जगताप, दिनेश तरटे, किशोर त्रिभुवन, गवळी, बापू साळुंखे, निलेश बोरा, थोरात, ॲड. अभिजित काळे, राहुल नागले आदींसह मान्यवर उपस्थित होते.