शिक्षणवारी ज्ञान पंढरी

अर्ली बर्ड प्री स्कूलचे नियोजन पाहून भारावले – गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अंजना फाउंडेशनच्या अर्ली बर्ड प्रि स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरवाने उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले. यावेळी अध्यक्ष सूचना मानसी रवींद्र आसने हिने मांडली तर आदिती मुठे हिने अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजी जासूद होते. संस्थेच्या प्राचार्या चित्रा आसने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संस्थेचे मार्गदर्शक योगेश आसने यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.

यावेळी अर्ली बर्ड प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, वकृत्व, उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पाहून भारावून गेल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांनी अर्ली बर्ड प्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, किशोर बनसोडे, माळवाडगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ शंकरराव मुठे, लोकसेवा विकास आघाडीचे गणेश छल्लारे, अशोकचे संचालक बाबासाहेब आदिक, माळवाडगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने, पोलीस पाटील दत्तात्रय मुठे, मधुकर बनसोडे आदींची प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी कासार व तन्वी गवारे यांनी केले तर योगेश आसने यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले.

यावेळी बाजीराव आसने, कारेगाव भागचे संचालक शिवाजी मुठे, शेषराव मुठे, गोरख दळे, नितीन बोर्डे, नवनाथ भोंडगे, मारुतीराव मुठे, सतीश आसने, अमोल मोरे, प्रदीप आसने, राजेंद्र आसने, अंकुश आसने, प्रसाद जगरुपे, बापूसाहेब आसने, अमोल आदिक, संकेत आदिक, संजय खताळ, नाना थोरात, दिलीपराव हुरुळे, दिनकर बनसोडे, सतीश आसने, अतिश आसने, भाऊसाहेब आसने, सुधीर आसने, इंजी. निलेश आसने, पत्रकार संदिप आसने, रवींद्र आसने, शिक्षिका सोनाली मुठे, निकिता मुठे, राणी पटारे, वंदना शिनगारे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button