ठळक बातम्या

पानमसाला, गुटखा विक्री व साठवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाकडून विशेष पथक निर्मितीचा आदेश

राहुरी : तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पानमसाला, गुटखा बंदी कडक करण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. सतीश तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करून आव्हान दिले होते.

सदर जनहित याचिका मध्ये असे नमूद आहे कि, पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, इ. ची बंदी बाबतच्या कार्यवाही साठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी विशेष पथक स्थापन करावे, पोलीस प्रशासनाने, अन्न सुरक्षा अधिकारींना सोबत घेऊन कार्यवाही करावी. पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ इ. ची बंदी बाबतच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर ची सुविधा चालू करावी व बोगस कार्यवाही करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सदर बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाचे न्या. श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्या. अभय वाघवसे यांनी राज्य शासनाला राज्यातील सात विभागासाठी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार विशेष पथकांची निर्मिती करून तसे परिपत्रक प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने एक सार्वजनिक टोल फ्री नंबर बनवून तो सदरील नंबर वेळोवेळी प्रकाशित करावा जेणेकरून सर्वसामान्य लोक या नंबर वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकतात, असे नमूद करत नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा बनवून त्या प्रयोगशाळा पूर्णत: अन्न सुरक्षा आणि मानक विभागाच्या ताब्यात दिल्या जातील, याची काळजी घ्यावी, असे आदेश देखील दिले आहेत.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सहा महिन्यांमध्ये नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा बनवण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ, आधुनिक मशीन, आणि पायाभूत सुविधा उभाराव्यात, असे देखील आदेशात म्हटले आहे. सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अजिंक्य काळे व ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी काम पहिले आहे तर शासनाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे यांनी काम पहिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button