अहमदनगर

पोलीस निरिक्षक जाधव यांची राहुरी तालुक्यातील जनतेला गरज

राहुरी | अशोक मंडलिक : अल्पावधीत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावारूपास आलेले राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील उंबरे येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची चौकशी प्रक्रियाकरिता पोलीस निरीक्षक जाधव यांची तात्पुरते स्वरुपात अहमदनगर नियंत्रण कक्षात नेमणूक केल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राहुरी पोलिस ठाण्यात अधिकारी टिकत नसल्याने कार्यकाळ पूर्ण करण्याच्या अगोदरच कोणत्या ना कोणत्या कारणाने पोलिस अधिकारी हे राजकारणाचा बळी ठरत आहेत. परिणामी राहुरी तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे. या अगोदरच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी राहुरी तालूक्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा दबदबा निर्माण केला होता. मात्र, त्यांचा देखील राजकारणामुळे बळी गेला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार घेतला.

गेल्या वर्षभरात धनंजय जाधव यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करुन गुन्हेगारांवर अंकुश ठेवला. शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम धनंजय जाधव यांनी केले. तसेच तालुक्यातील खून, दरोडे व घरफोड्या आदि गुन्ह्यातील गुंडांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. परिणामी, तालुक्यातील गुन्हेगारी आटोक्यात आली होती. मात्र, त्यांचा देखील राजकारणाचा बळी ठरु पाहत आहे. राजकारणामुळे पोलिस अधिकाऱ्यांचा बळी जात असेल तर ही फार निंदनीय बाब आहे. 

पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याची राहुरी तालुक्याला नितांत गरज आहे. जेणेकरून गुन्हेगारीवर आळा बसेल. बाल हक्क आयोगाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना पुन्हा राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार द्यावा, अशी मागणी राहुरी तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button