अहमदनगर

उत्कृष्ट कार्याबद्दल कार्यकारी अभियंत्या सायली पाटील यांना पुरस्कार जाहीर

राहुरी | अशोक मंडलीक : जलसंपदा विभागातील अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंत्यांना सन – २०२१ या वर्षांकरिता वैयक्तिक व सांघिक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्या (स्थापत्य) कु. सायली राजेंद्र पाटील यांना विशेष गुणवत्तेसह उल्लेखनीय कामगिरी कार्याबद्दल वैयक्तिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

सायली पाटील या जलसंपदा विभागातील मुळा पाटबंधारे विभागात गेल्या चार वर्षांपासून कार्यकारी अभियंता या पदावर काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागात काम पाहिलेले आहे. नुकत्याच मुळा विभागातील उजव्या कालव्यावरील पाणी वापर संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. सायली पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button