अहमदनगर

सोनगाव येथे महात्मा फुले पुण्यतिथी व संविधान दिन साजरा

सोनगाव : येथील महात्मा फुले युवा मंचच्या वतीने महात्मा फुले यांची १३३ वी पुण्यतिथी तसेच २६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विखे पाटील कारखान्याचे संचालक सुभाष पाटील अंत्रे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप आणि सूर्यभान शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री अनाप म्हणाले की, महात्मा फुले यांनी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवजन्मोत्सव सुरू केला. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा बंद केल्या. स्त्री शिक्षणाची दारे खुली करून दिली. विधवा महिलांचे पुनर्विवाह केले. समाजातील अस्पृश्य घटकाला प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले, परंतु आज १३३ वर्षे उलटून देखील त्यांना अपेक्षित समता-बंधुता स्थापित झालेली दिसत नाही. त्यामुळे तरुण पिढीने फुले जन्माला येण्याची वाट न बघता स्वतः कृती करून इतरांना प्रेरित करून महात्मा फुले यांचे खऱ्या अर्थाने वारसदार बनायला हवे आणि हेच खऱ्या अर्थाने फुल्यांचे स्मरण असणार तसेच तोच फुलेंचा वारसा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जपला व आपल्या देशाला संविधान दिले. वंचित, शोषित, दलित यांना इतराप्रमाने समान हक्क मिळवून दिला.

यावेळी मा. उपसरपंच किरण पाटील अंत्रे, विजय कानडे, विनोद अंत्रे, सुनील अंत्रे, प्रशांत अंत्रे, संदीप अनाप, शामराव अंत्रे, राजन ब्राम्हणे, योगेश सिन्नरकर, संजय कानडे, मधुकर अनाप, वसंत अंत्रे, बाळासाहेब दिघे, शरद अंत्रे, निलेश अंत्रे, मथाजी अनाप, अन्सार तांबोळी, अफजल तांबोळी, महम्मद तांबोळी, सुभाष शिंदे, गणेश अनाप, सेवा संस्था व ग्रामपंचायतचे आजी माजी संचालक, सदस्य, फुले प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मा. उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन बिपिन ताठे यांनी केले आणि आभार विजय कानडे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button