अहमदनगर
कृषि विद्यापीठातील कारभाराबाबत आ. तनपुरे यांचा जनता दरबार
राहुरी | अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कडून प्रशासकीय कार्यलयासमोर जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. या जनता दरबारात विद्यापीठामध्ये कामकाजासाठी येणाऱ्यांची होणारी अडवणूक, ठेकेदारांचे बिल अडवून ठेवणे, जाणूनबुजून कामे प्रलंबित ठेवणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकणे, विद्यापीठ हद्दीत सुरक्षा रक्षकांकडून होणारी अडवणूक आदी प्रकार बाबत जाब विचारला जाणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या सर्व समस्यांबाबत प्रशासकीय कार्यालय प्रवेशद्वार समोर दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.