अहमदनगर
ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते शिरसगाव निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे तिरंगी लढतीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गणेशराव मुदगुले गटास बहुमत मिळवून शिरसगाव ग्रामपंचायतीत सत्ता जिंकली. त्यामुळे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वा.आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून शिरसगाव ग्रामस्थांसह सर्व सदस्यांनी या सत्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन गणेशराव मुदगुले, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रामसेवक पी डी दर्शने, सर्व ग्रा. प. सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.