अमृत कलश यात्रेला देहरे येथे कृषी कन्यांनी केला प्रारंभ
नगर : ‘माझी माती, माझा देश’ या मोहिमे अंतर्गत तालुक्यातील देहरे या गावात अमृत कलश हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. गावातील माती कलशात एकत्रित करण्याचे आव्हान कृषीकन्यांनी केले.
हा अमृत कलश 30 सप्टेंबर पर्यंत अहमदनगर शहरात फिरणार असून या कलशामध्ये जमा झालेली माती व तांदूळ २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे पाठविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम देहरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दि २० सप्टेंबर २०२३ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अब्दुल खान हे होते. यावेळी युवा नेते महेश काळे यांनी देहरे ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि या कलश यात्रेला शुभेच्छा दिल्या. प्रा. सुहास पाखरे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्टेज डेएअरींग कशी वाढवायची याबद्दल मार्गद्शन केले.
यावेळी सूत्र संचालन कृषीकन्या मैथिली सुर्यवंशी हीने तर प्रास्ताविक विद्यालयाचे प्राध्यापक यांनी केले, माजी सैनिक ईश्वर काळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. देहेरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलंग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषि महाविद्यालय विळदघाट येथील कृषीकन्या कु. लांबे पुजा सूर्यभान, कु. तांबे भैरवी भानुदास, कु. लष्करे प्रथमेशवरी संतोष, मोहिते शुभदा, सूर्यवंशी मैथिली या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबवत असतात, त्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिंनंदन होत आहे.
या कार्यक्रमास सरपंच नंदा संतोष भगत, उपसरपंच दिपक जाधव, युवा नेते महेश काळे, अमोल काळे,
माजी सरपंच अब्दुल खान, माजी सरपंच किसन धनवटे, माजी सैनिक ईश्वर काळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, किरण लांडगे, प्रविण करंडे, दिपक बर्डे, नवभारत विद्यालयाचे लष्करे सर, बर्डे सर, विद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व कृषी महाविद्यालयाचे प्रा. के.एस. दांगडे, पी.सी.ठोंबरे, डी.पी. मावळे, रोंगे मॅडम, एम.ए.खेडेकर, प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.बी.राऊत आदी उपस्थित होते.