महिलांनी सक्षमीकरणासाठी व्यवसायात उतरावे- अनुराधा आदिक
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महिलांनी व्यवसायात उतरण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यवसायात त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. शर्मिला भोर यांनी आयोजित केलेले हे प्रदर्शन अत्यंत सुंदर वाटले व सर्व प्रकारच्या देशातील नामांकित कंपन्यांच्या साड्या त्यात होत्या असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शर्मिला माधवराव भोर यांनी जिजाऊ साडी प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
दि १६ व दि १७ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर मातोश्री मंगल कार्यालय चौधरी वस्ती वार्ड क्र ७ येथे जिजाऊ साड्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात डोला सिल्क, कोरा, औरगंजा, कलकत्ता हंडलूम, जामदानी खड्द्दी बनारसी, जॉर्जेट, फन्सी,व पारंपारिक साड्याची ग्राहकांनी खरेदी यावेळी केली.
या प्रदर्शनास सौ शर्मिला भोर, भागचंद औताडे, रामभाऊ औताडे, दत्तात्रय औताडे, किशोर पाटील, नितीन गवारे, अर्जुन आदिक, सौ सबनीस, तुकाराम गवारे, अभिजित लीपटे, बोंबले, वायाळ, बोखारे परिवार आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर व महिला उपस्थित होत्या.