ठळक बातम्या

राज्य सरकार “गतिमान” नसून “मतिमंद” सरकार असल्याची आमदार तनपुरे यांची जहरी टीका

राहुरी | अशोक मंडलिक : राहुरी विधानसभा मतदार संघातील तब्बल २९ कोटी रुपयांची रस्त्यांची विकासकामे मंजुर असताना देखील सदर कामांचे कार्यारंभ आदेशाला सरकाराने ब्रेक लावल्याने हे तिघाडी सरकार “गतिमान” नसून “मतिमंद” सरकार असल्याची जहरी टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रस्ता रोको वेळी केली आहे.

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील अनेक रस्त्यांची विकास कामे मंजूर आहेत. त्यामधील सुमारे २९ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कार्यारंभ आदेशाला शासनाने ब्रेक लावला आहे. कार्यारंभ आदेश हे रोखल्याने आमदार प्राजक्त तनपुरे हे चांगलेच संतप्त झाले होते. राहुरी-नेवासा रोडवरील आरडगाव बस स्थानकावर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

जोपर्यंत कार्यारंभ आदेश मिळत नाहीत. तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्र आ. तनपुरेंनी घेतला होता. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या मुखमंञी ग्रामसडक योजनेचे उपअभियंता एस.जी.गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पंधरा दिवसाच्या आत कार्यरंभ आदेश देण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपला रास्ता रोको मागे घेतला. प्रसंगी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार चंद्रजित रजपुत यांच्याकडे देण्यात आले. प्रसंगी तलाठी सोनाली जऱ्हाड, पोलीस विभागाचे अशोक शिंदे, प्रविन बागुल, रविंद्र कांबळे आदि होते.

प्रसंगी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, रविंद्र आढाव, डाॅ.राजेंद्र बानकर, सुनील मोरे, नितीन बाफना, मानिक तारडे, संदिप पानसंबळ, भारत तारडे, ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट, प्रकाश आढाव, उमेश खिलारी, संतोष काळे, रमेश वने, नंदकुमार पेरणे, विजय कातोरे, राजेंद्र आढाव, सदाशिव तारडे, अरूण डोंगरे, कैलास झुगे, सहादु झुगे, नानासाहेब म्हसे, शिवाजी आढाव, इंद्रभान पेरणे, आनंद वने, आदिनाथ बाळासाहेब आढाव, कैलास झुगे, गोकुदास आढाव, भारत तारडे, निलेश जगधने, विक्रम पेरणे, आण्णासाहेब तोडमल, नवनाथ थोरात, भाऊसाहेब आढाव, विलास धसाळ, जालिंदर काळे आदींसह लाभदायक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या काळात शासनाकडे अनेक रस्ते प्रस्थावित केले होते. त्या काळात अनेक कामे मंजूर झालेले आहेत. त्यानंतर मात्र सरकार बदलले अनेक मुख्यमंत्री सडक योजनेतील कामांकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही, मार्च महिन्यात त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली. टेंडर देखील पब्लिश झाले, टेंडर पब्लिश झाल्यानंतर दीड महिन्यात प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश येणे क्रमप्राप्त आहे. मात्र सहा महिने होऊन देखील कार्यारंभ आदेश मिळत नसल्याने हा रास्ता रोको केला. कार्यारंभाचे आदेश देण्यात येईल असं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ही कामे सुरू होतील – आ.प्राजक्त तनपुरे

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button