धार्मिक

पवित्र मरीयेप्रमाणे आपल्या लेकरांवर पावित्र्याचे व प्रार्थनेचे संस्कार घडवावेत- फा.संदीप जगताप

हरेगाव यात्रापूर्व पहिले पुष्प नोव्हेनाप्रसंगी संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथे मतमाउली यात्रा शुभारंभ झाल्यावर पहिले पुष्प नोव्हेनाचे गुंफताना पुणे येथील फा.संदीप जगताप यांनी प्रतिपादन केले की आपण आज पवित्र मरीयेचा अमृत महोत्सवी यात्रेचा अध्यात्मिक सण साजरा करण्यासाठी अध्यात्मिक तयारी करीत आहोत. पहिले पुष्प गुंफताना फार आनंद वाटतो. पहिल्या पुष्पाचा विषय आहे ”पवित्र मारिया पावित्र्याचा आदर्श.” पवित्र मारिया ही देवमाता आहे.

मरिया व पवित्र हे दोन शब्द वेगळे करू शकत नाही म्हणून मारियेला पवित्र मरिया असे म्हटले जाते. पवित्र मरिया ही पवित्र आत्म्याची ती वधू आहे. पवित्र आत्मा जो त्रेक्यातील तिसरा व्यक्ती आणि देव आहे ती देवपित्याची वधू आहे. तसेच देवपुत्र पवित्र त्रेक्यातील दुसरी व्यक्ती आपल स्वामी प्रभू येशू ख्रिस्त त्याची ती आई आहे. पवित्र त्रेक्याचे व पवित्र मरीयेचेएक अतूट नाते आहे.

या पवित्र मरीयेचा आदर्श आपण आपल्या जीवनात बाळगायला हवा. पवित्र मरिया आपल्या लेकरांवर आईसारखे संस्कार घडवीत असते. पहिला संस्कार ती करते तो पावित्र्याचा, दुसरा संस्कार प्रार्थनेचा, पवित्र मरीयेचे जीवन पावित्र्याचे जीवन होते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तिच्या उदरी देवपुत्राचा गर्भ राहिला. नंतर तिने पवित्र असे जीवन जगले. हाच देवपुत्र मग पुढे क्रुसावर जाउन अखिल मानव जातीच्या पापक्षालनासाठी स्वत:चे प्राण अर्पण करतो. अखिल मानव जातीची पापे धुवून टाकून सर्वांना पवित्र करतो.

जेंव्हा आपण पवित्र मारियाबरोबर, पवित्र पुत्राबरोबर येशू ख्रिस्ताबरोबर देवपित्याबरोबर असतो तेंव्हा आपण पवित्र जीवन जगत असतो. आपल्या घरातही आपण पवित्र मरिया जसे आपल्या लेकरांवर संस्कार करते तसे आपणही आपल्या लेकरांवर संस्कार करावे. त्यांच्यावर पावित्र्याचे व प्रार्थनेचे संस्कार करायला हवेत. आपल्या जीवनात आई वडिलांनी पवित्र जीवन जगायला हवे की जेणेकरून त्यांचा कित्ता त्यांची लेकरे गिरवतील व आपल्या कुटुंबात सदैव प्रार्थनेचे वातावरण असावे. जेणेकरून आपण देखील पवित्र मरीयेप्रमाणे एक प्रार्थनामय जीवन जगू या.

या नोव्हेनाप्रसंगी हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, सचिन, रिचर्ड, श्रीरामपूर फा ज्यो गायकवाड, संजय पंडित आदी सहभागी होते. दि ३० ऑगस्ट रोजी यात्रा शुभारंभ झाला असून यात्रेपर्यंत रोज दहा दिवस सायंकाळी ५.३० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असतो. परंतु त्यावेळी महावितरणचा वीज पुरवठा गायब असतो. महावितरणला या कार्यक्रमाची माहिती नसावी. त्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी महावितरणला सूचना देऊन भारनियमात बदल करावा. हजारो भाविक अंधारात असतात, समक्ष पाहणी करावी व दोन दिवसात वीज भार नियमात तातडीने बदल करण्याची गरज आहे असे ग्रामस्थांना वाटते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button