अहमदनगर

संगमनेर तालुका पेन्शनर्स मासिक सभा संपन्न

संगमनेर शहर : रविवार, दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी पेन्शनर भवन संगमनेर येथे दुपारी मासिक सभा झाली. प्रास्ताविक व समारोप तालुकाध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी केले. सभेत सर्वश्री सुलेमान भाई, विठ्ठल गागरे, याकुब भोसले, दिक्षित, मचाले, बलसाने, राजेंद्र क्षेत्रीय, बाळासाहेब देशमुख यांनी कमांडर अशोकराव राऊत अटकेचा निषेध, संघटना मजबूत करणे, मोर्चा काढणे इत्यादी बाबींवर विचार मांडले.

आंदोलन व मेळाव्यात सहभागी न होता घरी बसूनच चौकशी करणार्यांबद्दल सर्वांनी तीव्र शब्दांत निषेध भावना व्यक्त केल्या. पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन दि.४ ऑगस्ट च्या घटनेची सविस्तर माहिती देवून दि.३ ऑगस्ट रोजी श्रम राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत दिलेल्या असंवेदनशील उत्तराचा व कमांडर राऊत यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. उपस्थितांनी सुचविले नुसार लवकरच संगमनेर येथे मोर्चाचे नियोजन करु असे आश्वासित केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button