अहमदनगर
रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची खा. लोखंडे यांच्याकडे मागणी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव ते खैरी व उंदिरगाव ते खानापूर रस्त्यांची दुर्दशा झाल्याने तातडीने निधी उपलब्ध करून रस्त्यांचे कामे करणेसाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांना उंदिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब नाईक, अशोक सह.साखर कारखान्याचे संचालक विरेश गलांडे, बाजार समितीचे माजी उपसभापती नितीन भागडे, लोकनियुक्त सरपंच सुभाष बोधक, वळदगावचे माजी सरपंच रामराव शेटे, विजय भवार, सोसाटीचे संचालक सुभाष शिंदे, अजय गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.