अहमदनगर

कृषी कन्यांकडून देहरे गावात “मेरी मिट्टी मेरा देश” हा कार्यक्रम साजरा

नगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौउडेंशन कॉलेज ऑफ ॲग्रीकलचर कॉलेजच्या कृषीकन्या यांनी सरपंच व जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. दहातोंडे यांच्या सहकार्याने स्वातंत्र्य दिनानिमित्त देहरे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षरोपण केले.

यावेळी कृषीकन्यांनी प्रमुख पाहुणे माजी सैनिक – मेजर संभाजी खजिंदार, मेजर संतोष काळे, मेजर आप्पा काळे, मेजर बाबासाहेब काळे, मेजर दादा काळे, मेजर संदीप कारंडे, मेजर सुभाष गायकवाड, मेजर अरुण जेजुरकर, मेजर बाबासाहेब बराट, मेजर संतोष कुसळकर व कर्मचारीवृंदाचा यथोचित सत्कार करताना त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी कृषीकन्यांनी महाविद्यालयाच्या अभिनव उपक्रमांची माहिती दिली.

या वेळी देहेरे गावचे सरपंच नंदा संतोष भगत, ग्रामसेवक साळवे नंदकुमार, ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दहातोंडे सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषीकन्या पुजा सूर्यभान लांबे, शुभदा आण्णा मोहिते, भैरवी भानुदास तांबे, मैथिली दत्तात्रय सूर्यवंशी, प्रथमेश्वरी संतोष लष्करे यांना प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.बी. राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे, प्रा. बी.व्ही. गायकवाड, प्रा. डॉ.एच.एल शिरसाठ, प्रोग्राम ऑफिसर प्रा. ठोंबरे मॅडम आदींचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button