धार्मिक

पवित्र मारियेचा संयमी आदर्श गुण आत्मसात करावा – फा. कदम

श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव येथील मतमाउली यात्रापूर्व सातवा नोव्हेना शनिवार संपन्न झाला, त्यावेळी मिस्सा प्रसंगी फा.रॉनी परेरा, प्रवचन फा.सतीश कदम यांनी केले. ‘परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मारिया’ या विषयावर फा.सतीश कदम यांनी सांगितले की, पवित्र मारिया प्रेमाची माता हा विषय आपण गांभीर्याने घेतला पाहिजे. या जगामध्ये प्रेमी जीवन जगणे म्हणजे एक प्रकारे दैवी जीवन जगणेसारखे आहे. संयम हा दैवी गुण आहे. हा गुण ज्यामध्ये आहे तो देवासारखा बनतो.

पवित्र मारिया देव नसून देवासमान झालेली आहे. तिने प्रभू येशूला या जगात आणले व आपल्याला दिले आहे. जसे परमेश्वराने आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगाला समर्पित केला तसेच पवित्र मारियेने सुद्धा उदरी या पुत्राला स्वीकारले व जगाच्या तारणासाठी तिने सहकार्य केले. तिने जगाच्या कल्याणासाठी केले. प्रभू येशू क्रुसावर जाईपर्यंत, मरेपर्यंत तुला देवाची इच्छा पूर्ण करावी लागेल असे सांगितले व स्वर्ग राजासाठी वाट मोकळी करून देण्यास सांगितले.

संयम म्हणजे दैवी गुण आपल्यात आहे. संयमी जीवन कोणी जगायला तयार नाही. काम कसे लवकर होईल याकडे पाहतो. पैसा संपत्ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जाते. पवित्र मारीयेने संयमी जीवन जगले नसते तर देवाचे जे नियोजन आहे ते साकार झाले नसते. संयमाने ते साकार झाले. देव सर्व काही गोष्टी घडवून आणतो. तिच्या पाच दु:खावर मनन चिंतन केले तर आपल्याला कळेल.

पहिला संयम ज्या वेळेस तिला आपला पुत्र ४० दिवसांचा झाला, त्यावेळेस तिने अर्पण करण्यासाठी मंदिरात आणला. सिमोनने भविष्यवाणी केली की, हा पुत्र तारणारा आहे. परंतु तुझ्या हृदयातून एक क्रिया पार पडेल. तो दुःखी, निराश, चांगला असताना, तू मरताना त्याला पाहशील, हे दु::ख सहन केले. दुसरे दु:ख बाळाला मारायला राजा पाहत होता. तेव्हा इजिप्त देशात पलायन करावे लागले, तिसरे दु:ख प्रभू १२ वर्षाचा असताना मंदिरात नेले, त्यावेळी हरवला गेला. तीन दिवस शोधीत होती. चौथे दु:ख येशू ख्रिस्त क्रुसावर पोहोचला त्यावेळी प्रभुची व आईची भेट झाली.

पाचवे दु:ख प्रभू क्रुसावर मरण पावल्यावर त्याला कबरीत ठेवले. पवित्र मारीयेचा संयमी जीवनाचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवायचा आहे. संयमी जीवन जगले तरच आपण देवपणामध्ये भाग घेऊ. जसे तिने दैवी मातृपणामध्ये भाग घेतला व आपणही देवपणामध्ये भाग घेऊ या. दैवी जीवन जगून स्वर्गराजाच्या दिशेने वाटचाल करू या.

नोव्हेना प्रसंगी घोडेगाव, सोनगाव, शेवगाव येथील धर्मगुरू फा.रॉनी परेरा, सतीश कदम, झेवियर, सुभाष त्रिभुवन, जयसिंग अमोल व प्रमुख धर्मगुरू डॉमनिक, सचिन, रिचर्ड आदी धर्मगुरू तसेच सर्व धर्मभगिनी सहभागी होत्या. येत्या १९ ऑगस्ट रोजी ‘पवित्र मारिया निष्कलंक माता’ या विषयावर संत मेरी चर्च संगमनेर, संत इग्नाठी चर्च घुलेवाडी येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत. त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख धर्मगुरु फा. डॉमनिक व सर्व धर्मगुरू, भगिनींनी केले आहे. यावेळी सौ. रुपाली रवी पाळंदे (पुणे ) यांनी स्नेह भोजन दिले व हर्षद हिवाळे यांनी वसतिगृहातील ८० मुलांना रायटिंग पॅड व पाऊच बक्षीस दिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button