अहमदनगर

हरेगांव मतमाऊली यात्रा भाविकांसाठी सुविधा देणार- आ. कानडे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगांव येथील राज्यात प्रसिद्ध अशा मतमाऊली यात्रेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्या सोहळ्याचे निमंत्रण तालुक्याचे आ. लहू कानडे यांना हरेगांव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक यांनी शिष्टमंडळ समवेत दिले. त्यावेळी यात्रेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा द्याव्यात यासाठी चर्चा झाली.

त्यात पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छता गृह आदी प्रश्नावर चर्चा झाली. यात्रा जवळ आल्याने खैरी ते हरेगांव रस्ता सतत मळीच्या टँकर वाहतूकीने नादुरुस्त झाला आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. तो रस्ता यात्रेपूर्वी सुरळीत व्हावा. ऊन पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी एक मंडप उभारावा आदींसाठी सहकार्य व्हावे, अशी मागणी केल्याने आ. लहू कानडे यांनी आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले.

माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, तालुका पोलीस विभाग आदींना निमंत्रण देण्यात आले. पोलीस निरीक्षक चौधरी यांनीही यात्रेपूर्वी शांतता कमिटीची बैठक आयोजित करून योग्य त्या सूचना संबंधीतांना देण्यात येतील. हरेगांव, उंदीरगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेही या कार्यात योगदान असते. यावेळी डी एस गायकवाड, सुभाष पंडित, बी सी मंडलिक, पीटर जाधव, बी आर चेडे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button