अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठात माजी सैनिकांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न

राहुरी विद्यापीठ : राहुरी तालुक्यातील माजी सैनिकांचा बहुमान व्हावा व त्यांनी देशाची सेवा तन, मन, धनाने व अतिशय प्रामाणिकपणे केल्याने त्यांचे ॠण व्यक्त करण्यासाठी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचा शाल व आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम केंद्र शासनाच्या सुचनेनुसार साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण कार्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान व डॉ. कैलास कांबळे यांच्या अथक परिश्रमातून कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेमीनार हॉलमध्ये संपन्न झाला.

याप्रसंगी डॉ. श्रीमंत रणपिसे म्हणाले की, माजी सैनिकांनी ज्या प्रमाणे देशप्रेमाने ओतप्रोत भरून देशसेवा केली तशीच आपल्या गावाची, समाजाची सेवा करून तरूणांना देशभक्तीचे धडे देऊन आदर्श नागरिक निर्माण करून भ्रष्टाचार मुक्त देश घडविण्यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी डॉ. कैलास कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात केंद्र सरकार राबवित असलेल्या मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ महावीरसिंग चौहान यांनी उपस्थित माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. याप्रसंगी माजी सैनिक जालिंदर पाटोळे, गंगाराम आडसुरे, मच्छिंद्र भालेराव, रामा तारडे, गिताराम येवले, संतोष लांडगे, प्रताप लांडगे, चंद्रकांत साळवे, आर.ए. पठाण, राजू पाटील, विजय पाटील व व्हि.एम. कदम या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. विरेंद्र बारई, डॉ. लांडगे, डॉ. ममता पटवर्धन, सहाय्यक अधिक्षिका श्रीमती अर्चना टकले व विद्यापीठ विद्यार्थी कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button