शिक्षणवारी ज्ञान पंढरी

राष्ट्रीय पात्रता परीक्षेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अभुतपूर्व यश

राहुरी विद्यापीठ : नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळातर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) महात्मा फुले कृषि विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील 102 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व समकक्ष पदाकरीता राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. राहुरी अंतर्गत येणार्या कृषि महाविद्यालयांच्या 102 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरीचे 79, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी 4, राजर्षी छत्रपती शाहु कृषि महाविद्यालय, कोल्हापूरचे 9, कृषि महाविद्यालय, पुणेचे 7 व कृषि महाविद्यालय, धुळे येथील 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के यांच्यासह विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button