अहमदनगर

सात्रळ येथे दादासाहेब पवार यांचा सत्कार

राहुरी : तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांना नुकताच राज्यस्तरीय समता पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच यशवंत नागरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी भास्करराव फणसे यांची पुनश्च निवडीबद्दल सात्रळ सोसायटी येथे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सात्रळ सोसायटीचे चेअरमन दिनकर पाटील कडू हे होते. सात्रळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दादासाहेब पवार यांचा बाळासाहेब केरूनाथ विखे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास अरुण पाटील कडू, बाळासाहेब विखे, अध्यक्ष दिनकर पाटील कडू, चेअरमन भास्करराव फणसे, गणेश कडु, प्रकाश घोलप, किशोर भांड, भगवान गागरे, आप्पासाहेब गागरे, सूर्यभान शिंदे, प्रभाकर पलघडमल, छगन वारुळे, बापुसाहेब दिघे, एकनाथ जाधव, आदिनाथ दिघे, अमोल दिघे, गणेश दिघे, दिलीप कडू आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button