अहमदनगर

राहुरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राहुरी : महाराष्ट्र राज्यातील को. ऑपरेटीव्ह क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ज्योती क्रांती को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. राहुरी शाखेच्या वतीने राहुरी शहरासह तालुक्यातील 10 वी व 12 वी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षिका सौ. वैशाली शेटे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास मंडळाचे विश्वस्त पंडित हजारे, शिक्षक बँकेचे संचालक गोरक्षनाथ विटनोर, गुरु माऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक नेते रविकिरण साळवे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र मच्छिंद्र गुलदगड, सौ. अपर्णाताई धमाळ, उद्योजिका सौ. वैशालीताई डहाळे, ज्येष्ठ शिक्षक श्री. सोलाट, सल्लागार मंडळ व सदस्य आदींची उपस्थिती होती.

राहुरी शहरासह तालुक्यातील 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी राहुरी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक आवर्जून उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती क्रांतीच्या शाखाधिकारी सौ. उषा शिरसाठ, कॅशियर किरण गुंजाळ, सौ. मनीषा गाडेकर, शाखा विकासक कृष्णा पोपळघट, फिल्ड ऑफिसर आदिनाथ होले, धनिक ऍडव्हायजरचे दिपक साखरे आदींनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राहुल खराडे यांनी केले.

या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या सर्वांचे ज्योती क्रांती शाखेच्या शाखाधिकारी सौ. उषा शिरसाठ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालक वर्गातून अनेकांनी आयोजित उपक्रमाचे कौतुक करत संपूर्ण ज्योती क्रांती परिवाराचे मनापासून आभार व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button