अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठात सर्विस सिलेक्शन बोर्डाचे पाच दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सतरा महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, अहमदनगर अंतर्गत असणार्या या एनसीसी युनिट तर्फे वेबिनार ऑन हाऊ टू क्रॅक सर्विस सेलेक्शन बोर्ड, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप, सुपर सक्सेसफुल माईंडसेट वर्कशॉप, कॅम्पस टू कॉर्पोरेट वर्कशॉप यासारखे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून विद्यार्थी आणि छात्र हे कशाप्रकारे जास्तीत जास्त सैन्यामध्ये अधिकारी म्हणून जातील यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी डॉ. अण्णासाहेब शिंदे महाविद्यालयामध्ये ब्रिगेडियर बोधे इन्स्टिट्यूट, पुणे यांच्यामार्फत सर्विस सेलेक्शन बोर्डाचे पाच दिवसाचे प्रशिक्षण दि. 6-11 जून, 2023 या दरम्यान महात्मा फुले कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये सैन्यामध्ये अधिकारी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत. त्या परीक्षा आणि प्रशिक्षण सतत पाच दिवस सकाळी 9.00 ते सायं. 6.00 या दरम्यान दिले जाईल. या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट सुनील उत्तम फुलसावंगे हे करणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button