अहमदनगर

बालकिर्तनकार कृष्णानंद महाराज यांचा बाल अनाथाश्रम म्हणजे मानवसेवेचे तीर्थक्षेत्र – डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत, समाजसेवक, देशभक्त, प्रामाणिक नागरिक ह्यांच्या समर्पित योगदानातून संस्कृतीशील समाज आणि आदर्श व्यक्तिमत्वे आकाराला येत असतात. श्रीरामपूर शहराला भूषणावह असणारे ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी सुरु केलेला बाल अनाथालय आश्रम म्हणजे आजच्या युगातील मानवसेवेचे खरे तीर्थक्षेत्र असून अशा सेवास्थळाला सर्वांगीण सहकार्य करणे हीच खरी देवपूजा होय, असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर जवळील बेलापूर दिघी रोडवर असलेल्या मु. गोखलेवाडी पोस्ट सुभाषवाडीसारख्या सुरक्षित शेतशिवारी असलेल्या पाच गुंठ्यात उभारलेल्या आश्रमात १५ निराधार विद्यार्थी, शिक्षण जीवन साधना करीत आहेत. तेथे साहित्यिक, सामाजिक आणि संस्कृतीशील उपक्रम आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे होते.

श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे अध्यक्ष बाल कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी गेल्या पाच वर्षांपासून केलेल्या कार्याची माहिती दिली. बेलापूर येथील दानशूर व्यक्तिमत्व असलेले प्रकाश मेहेत्रे यांनी दिलेल्या जागेत हा आश्रम सुरु केला असून काही सेवाभावी व्यक्तींच्या योगदानातून आपल्या कार्याला प्रकाशवाट मिळाली असल्याचे सांगून महाराजांनी सर्वांचे स्वागत करून सत्कार केले. उपाध्यक्ष प्रकाश चांगदेव मेहेत्रे, सचिव ह भ.प. ज्ञानेश्वर महाराज आढाव आणि विद्यार्थी यांनी सुंदरपणे नियोजन केलेल्या उपक्रमाचे डॉ. उपाध्ये यांनी कौतुक केले.

पत्रकार राजेंद्र देसाई यांनी अनाथ आश्रमातील विविध सांस्कृत्यिक आणि शैक्षणिक उपक्रमाची माहिती कृष्णानंद महाराज यांच्या अथक परिश्रमातून आकार घेत असलेल्या परिसराचे भाग्य भविष्यात मोठे असेल असे सांगून डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे, प्रा.सौ. पल्लवी सैंदोरे परिवाराचा परिचय करून दिला. यावेळी या सर्वांचा कृष्णानंद महाराज यांनी सत्कार केले. श्रीराम सैंदोरे या एक वर्ष वयाच्या मुलाचा वाढदिवस आश्रमातील १५ मुलांनी साजरा केला.

यावेळी कृष्णानंद महाराज म्हणाले, आज भव्य, महागड्या हॉटेलात पार्ट्या आयोजित करून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले जाते. परंतु भारतीय आर्मीतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मेजर नंदकुमार सैंदोरे, रयत शिक्षण संस्थेतील प्रा. सौ. पल्लवी सैंदोरे यांनी आपल्या श्रीरामचा पहिला वाढदिवस अनाथ मुलांना पुरणपोळी, आमरस असे समवेत भोजन देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जो दुर्लक्षित माणसांना जवळ करतो तोच आत्मसमाधान आणि सेवासंस्कृतीला बळ देतो, असे सांगून सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी स्व. सौ. पुष्पाताई सुकळे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. सुकळे यांनी आश्रमाच्या सेवाकार्याला पाच हजार रुपये देणगी दिली आणि आपल्या अध्यक्ष मनोगतातून आश्रमाच्या कार्याला सदैव मदत करू असे सांगितले. सौ.मंदाकिनी उपाध्ये, डॉ. सौ. प्रीती बोरुडे, सौ.सुरेखा बुरकुले, सौ.माधुरी जोर्वेकर, सौ.जयश्री जोर्वेकर, प्रा.सौ. समिना शेख, कु.ताराताई सैंदोरे, संजय बुरकुले, गणेशानंद उपाध्ये, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, नितीन जोर्वेकर, कचरू जोर्वेकर, डॉ. रामभाऊ बोरुडे, आदिंनी उपक्रमाचे नियोजन केले. कु. मानसी रवींद्र सैंदोरे हिने १० वी परीक्षेत ८७ % गुण मिळविल्याबद्दल कृष्णानंद महाराजांनी तिचा सत्कार केला.

निपाणी वडगावचे ग्रामपंचायत सदस्य भागचंद नवगिरे, सामाजिक कार्यकर्ते अजित राऊत यांनी कृष्णानंद महाराज, सुखदेव सुकळे, मेजर नंदकुमार सैंदोरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीराम सैंदोरे यांचे सत्कार केले. सुखदेव सुकळे यांनी शहात्तर वर्षात, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सहासष्ट वर्षात जे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्य केले. त्याबद्दल भागचंद नवगिरे यांनी त्यांचा सत्कार करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पत्रकार राजेंद्र देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर आश्रमाचे सचिव ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button