ठळक बातम्या

राजघराण्यांसह सरदार व मावळ्यांच्या वंशजाकडून शंभुछत्रपतींना पारंपारिक शस्त्र मानवंदना

पुणे : विश्व हिंदू मराठा संघ व समस्त शिव- शंभुभक्तांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन, पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर तारखेनुसार आयोजित केलेल्या शंभूछत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त थोर शूरवीर राजघराणे, सरदार व मावळ्यांच्या वंशजांकडून महाआरती करून महाराजांना पारंपरिक पद्धतीने शस्त्र मानवंदना देण्यात आली.

१४ मे २०२३ रोजी अवघ्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत असताना जगातील पहिल्या, डेक्कन पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकावर विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात शंभूजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारताचे पहिले पेरोऑलम्पिक जलतरण सुवर्णपदक विजेते, माजी सैनिक, पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर, पुण्याचे पालकमंत्री आमदार मा. चंद्रकांत पाटील, ऐतिहासिक राजघराणे प्रतिनिधी म्हणून महाराणी येसूबाई यांच्या राजेशिर्के घराण्याचे वंशज व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांच्यासह शुरवीर सरदार व मावळ्यांच्या वंशज घराण्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

तसेच पारंपरिक पद्धतीने शस्त्र मानवंदना देताना स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज शंभुसेना संघटना प्रमुख दिपकराजे शिर्के, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे निर्माते व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सरसेनापती संदीप मोहिते, सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज सरदार मंगेश शिळीमकर, वीर धाराऊ माता गाडे पाटील यांचे पुत्र सरनौबत अंतोजजी गाडे पाटील यांचे वंशज अमितजी गाडे, विश्वातील सर्वात मोठ्या रथयात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष गायकवाड घराण्याचे वंशज अमित गायकवाड, सरदार झुंजारराव मरळ यांचे वंशज प्रदीप मरळ, सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज सरदार आबासाहेब गोळे आदी वंशज मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रमुख अंगरक्षक कृष्णाजी उर्फ बंकी गायकवाड यांचे वंशज विश्व हिंदू मराठा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पै.भूषण वर्पे, उपाध्यक्ष पै. वैभव दिघे, सचिव गौरव धावडे, खजिनदार महेश रणदिवे, गणेश चोरघे, पै. करण वाकोडे व सौ.पुजाताई फडके यांचे योगदान लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button